गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (20:38 IST)

पुढील 24 तास पावसाचा अंदाज

हवामान खात्याने सांगितले की, 21 जानेवारीपासून ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा ईशान्य भारतावर परिणाम होऊ शकतो. वातावरणातील बदलामुळे वातावरणात बदल होत आहेत. आईएमडी ने ऑरेंज कोल्ड अलर्ट जारी केला आहे
 
हिवाळा सुरु असून सध्या देशात कडाक्याची थंडी पडली आहे. वातावरणातील बदलांमुळे ऐन थंडीतही पाऊस कोसळत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.
 
देशात यंदा कडाक्याची थंडी पडली आहे. गेल्या बऱ्यास दिवसांपासून राज्यात थंडीनं हुडहुडी भरली आहे. उत्तरेकडून राज्याकडे वाहत असलेल्या थंड वार्‍यांमुळे राज्यातील सर्वच भागांत किमान तापमान सर्वसाधारणपणे 1 ते 3 अंश सेल्सिअसने घसरले होते. अगदी दिवसादेखील थंडी जाणवत आहे.
 
आयएमडीकडून थंडीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील चोवीस तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. त्यानंतर थंडीचा जोर हळुहळू कमी होण्याची शक्यता आहे. 21 जानेवारीपासून ईशान्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.