शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 12 ऑगस्ट 2024 (13:39 IST)

मेरठ मध्ये एका 72 वर्षाच्या शिक्षिकेने केला पतीवर हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल

crime
मेरठ मधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे एका 72 वर्षीय महिलेने आपल्या पतीच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशावरून हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. या महिलेचे घटस्फोट 2 वर्षांपूर्वी झाले आहे. 

महिला ईश्वरपुरीतील रहिवासी असून 72 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिका आहे. महिलेचा घटस्फोट दोन वर्षांपूर्वी झाला आहे. महिलेचे लग्न 48 व्या वर्षी नरेश नावाच्या व्यक्तीशी झाले. त्याने एका खासगी कंपनीत सुपरवायझर असल्याचं भासवीत फसवणूक करून लग्न केल्याचा आरोप महिलेने केला आहे. नंतर महिलेला समजले की नरेश काहीच काम करत नसून त्याला दारूचे व्यसन होते. तो नेहमी तिला पैशाची मागणी करायचा. नकार दिल्यावर तो मारहाण करायचा.सततच्या त्रासाला कंटाळून महिला आपल्या माहेरी आली. 

काही दिवसांनी तिचा पती तिला घ्यायला माहेरी आला आणि त्याने तिची माफी मागितली. काही दिवसांनी तो पुन्हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला. आणि महिला सात महिन्यांची गरोदर असता तिला मारहाण केली त्यात तिचा गर्भपात झाला. नंतर आरोपीने तिचे पैसे हिसकावून घेण्यासाठी झोपेतच तिच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार केला त्यात महिला बेशुद्ध झाली. तिला भावाने रुग्णालयात नेले तिला अशक्तपणा आला होता आणि स्मरणशक्ती कमकुवत झाली असून शरीराच्या अर्ध्याभागी अर्धांगवायू झाला. 
 
2022 मध्ये कौटुंबिक न्यायालयाच्या माध्यमातून  महिलेने हुंड्यासाठी पती तिचा छळ करायचा आरोप करत दोन वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला. तिने या आरोपावर पतीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही .आता न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी नरेशच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
Edited by - Priya Dixit