सत्तेत असलो, तरी निर्णय घेऊ शकत नाही : राहुल गांधी
देशात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी देशातील परिस्थिती आणि केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांविषयी राहुल गांधी यांनी भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील वाढत्या रुग्णसंख्येविषयी भूमिका मांडली. दाट वसाहत असलेल्या ठिकाणी करोनाचा प्रसार जास्त होतो. त्यामुळेच मुंबई आणि दिल्लीतील रुग्ण संख्या जास्त आहे. महाराष्ट्रातील सरकारला आमचा पाठिंबा आहे. पण मोठे निर्णय घेण्याइतके अधिकार काँग्रेसला नाही.
आमच्याकडे पंजाब, छत्तीसगढ व राजस्थानमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे. अस असलं तरी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मदत मिळायला हवी. आम्ही सरकारला सूचना करू शकतो. त्या स्वीकारायच्या की नाही हे सरकारवर अवलंबून आहे,” असं राहुल गांधी म्हणाले.