शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 13 मार्च 2018 (15:15 IST)

रेल्वेकडून महिलांसाठी आता लोअर बर्थचा कोटा निश्चित

भारतीय रेल्वेने महिलांसाठी आता लोअर बर्थचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. विविध कोचमध्ये महिलांसाठीच्या लोअर बर्थची संख्या निश्चित करण्यात आलीये. रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मेल आणि एक्सप्रेस रेल्वेच्या सर्वच स्लीपर क्लासच्या कोचमध्ये सहा-सहा बर्थ महिलांसाठी आरक्षित केले जातील. सॉफ्टवेअर अपडेट झाल्यानंतर ही सुविधा लागू केली जाणार आहे. त्यासोबतच गरीब रथच्या एसी-३ कोचमध्येही सहा बर्थ रिझर्व्ह करण्यात आले आहेत. तसेच ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिलांसाठीही मेल आणि एक्सप्रेस रेल्वेच्या थर्ड एसी-सेकेंड एसी कोचमध्ये ३-३ बर्थ रिझर्व्ह करण्यात आले आहेत. 

राजधानी आणि दुरोंतोसोबतच पूर्णपणे एसी रेल्वेच्या एसी-३ मध्ये चार लोअर बर्थचा कोटा निश्चित करण्यात आलाय. महिला प्रवाशांसाठी लोअर बर्थ निश्चित करण्यासाठी आयटी शाखा क्रिसकडून रिझर्वेशन सिस्टममध्ये नवीन सॉफ्टवेअर विकसीत केलं जात आहे. सोबतच रेल्वेकडून आता वेटिंग तिकीट कन्फर्म करण्यात महिलांना त्यांच्या वयानुसार प्राधान्य देण्याची सिस्टम डेव्हलप करत आहे. इतकेच नाहीतर रेल्वेत बर्थ रिकामा असल्यास टीटीई सुद्धा महिलांनाच प्रथम बर्थ देणार. तर वरिष्ठ नागरीकांसाठी आता वेगळा कोटा ठेवला जाणार आहे. वयोवृद्ध नागरीकांनाही लोअर बर्थ देण्याची सिस्टम तयार होत आहे. रेल्वे अधिका-यांनुसार लोअर बर्थ रिकामा असल्यास इतर प्रवासी तो बुक करू शकतील.