शुक्रवार, 5 जुलै 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 11 सप्टेंबर 2023 (23:14 IST)

Indigo :फ्लाइटमध्ये महिला प्रवाशाचा विनयभंग , आरोपीला अटक

Indigo Orders 500 Jets
Indigo : सध्या विमानांमध्ये प्रवासी आणि क्रू मेंबर्ससोबत गैरवर्तनाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. देशांतर्गत उड्डाण असो की आंतरराष्ट्रीय विमाने, अशा घटना कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. या मालिकेतील ताजे प्रकरण इंडिगोच्या फ्लाइटमध्ये पाहायला मिळाले आहे. येथे एका व्यक्तीने महिला प्रवाशासोबत घाणेरडे कृत्य केले आहे. हे विमान मुंबईहून गुवाहाटीला जात होते. यावेळी एका व्यक्तीने महिलेचा विनयभंग केला. या लाजिरवाण्या कृत्यानंतर त्या व्यक्तीवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

सदर घटना 10 सेप्टेंबर रोजीची असून इंडिगोचे विमान मुंबईहून गुवाहाटीला जात असताना  विमानात अचानक एका व्यक्तीने महिलेसोबत घाणेरडे कृत्य करण्यास सुरुवात केली. विमान हवेतच होते आणि या व्यक्तीचे गैरवर्तन वाढत होते. ही घटना फ्लाइट क्रमांक 6E 5319 मध्ये घडली. पीडितेने याबाबत तात्काळ क्रू मेंबर्सकडे तक्रार केली. यानंतर सदस्यांनी कारवाई करत त्या व्यक्तीला बाजूला बसवले आणि नंतर त्याला आसाम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गोवाहटी येथे विमान उतरल्यानंतर पीडित महिलेने तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली. 
 
इंडिगोकंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहोत. या संदर्भात आमच्याकडून जी काही मदत लागेल ती आम्ही देऊ. कंपनीकडून असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, महिला प्रवाशाने पुरुषाच्या वर्तनाची माहिती देताच आम्ही तातडीने विमानातच कारवाई केली. 
 
Edited by - Priya Dixit