1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 3 सप्टेंबर 2023 (10:26 IST)

Indigo Flight: इंडिगो विमानाच्या टॉयलेटमध्ये धुम्रपान केल्या प्रकरणी प्रवाशाला अटक

फ्लाइटमध्ये धुम्रपान करण्यास बंदी आहे, परंतु असे असूनही फ्लाइटमध्ये धूम्रपानाची प्रकरणे थांबत नाहीत. ताजे प्रकरण इंडिगोच्या दुबई-कोलकाता फ्लाइटमध्ये पाहायला मिळाले. येथे एका प्रवाशाला टॉयलेटमध्ये धुम्रपान केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. इंडिगोचे विमान दुबईहून कोलकाता येथे येत होते. दरम्यान, विमानातील एका प्रवाशाने टॉयलेटमध्ये धुम्रपान केले.
 
इंडिगोचे विमान दुबईहून कोलकाता येथे येत होते. दरम्यान, विमानातील एका प्रवाशाने टॉयलेटमध्ये धुम्रपान केले. केबिन क्रू आणि सहप्रवाशाने त्या व्यक्तीला टॉयलेटमध्ये धुम्रपान करताना पाहिले, त्यानंतर त्यांनी विमानाच्या पायलटला याची माहिती दिली . त्यानंतर विमान सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यावर प्रवाशाला अटक करण्यात आली.
प्रवाशी शौचालयात धूम्रपान करत होता
 
या प्रकरणाची तक्रार विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे करण्यात आली. त्यानंतर त्यांनी आरोपी प्रवाशाला अटक केली. यावेळी आरोपी प्रवाशाची सीआयएसएफ अधिकाऱ्यांनी चौकशीही केली. नंतर त्यांनी प्रवाशाला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले.
 
सध्या पोलीस प्रवाशाची चौकशी करत आहेत. तसेच, विमान नियम 1937 च्या कलम 25 अंतर्गत प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी इंडिगो एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी फ्लाइटमध्ये धुम्रपान करण्यास पूर्णपणे बंदी आहे. त्यांनी सांगितले की, प्रवासी धूम्रपान करत असताना फ्लाइटमधील लोकांच्या लक्षात आले आणि कारवाई करण्यात आली. अन्यथा मोठी घटना घडू शकली असती.
 
 
Edited by - Priya Dixit