शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (13:40 IST)

इंदूरने सलग सहाव्यांदा सर्वात स्वच्छ शहरचे पुरस्कार पटकावले, मध्य प्रदेश सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य ठरले

गांधी जयंतीच्या निमित्ताने 'स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022' घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात इंदूरला सलग सहाव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून बाजी मारली आहे. तर सुरत आणि नवी मुंबईने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. 'स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022' मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या राज्यांच्या श्रेणीमध्ये मध्य प्रदेशने प्रथम क्रमांक पटकावला आहे, त्यानंतर छत्तीसगड आणि महाराष्ट्राचा क्रमांक आहे. 
 
इंदूर आणि सुरतने यावर्षी मोठ्या शहरांच्या श्रेणीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे, तर विजयवाडाने नवी मुंबईकडून तिसरे स्थान गमावले आहे.
 
एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेली टॉप 10 शहरे आहेत: इंदूर, सुरत, नवी मुंबई, GVM, विशाखापट्टणम, विजयवाडा, भोपाळ, तिरुपती, म्हैसूर, नवी दिल्ली आणि अंबिकापूर.हे समाविष्ट आहे. 
 
एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत महाराष्ट्रातील पाचगणी पहिल्या क्रमांकावर आहे.
 
एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या गंगा नदीच्या काठावरील शहरांमध्ये बिजनौरने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर नाशिकच्या देवळालीने सर्वेक्षणात  देशातील सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणून गौरविण्यात आले.
 
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी येथे एका कार्यक्रमात विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी आणि इतरही उपस्थित होते.
 
Edited By - Priya Dixit