मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जानेवारी 2024 (12:54 IST)

तरुणीच्या फूड पाईपमध्ये 13 वर्षांपासून अडकले होते नाणे

Indore News as Coin was stuck in girl food pipe for 13 years
एका तरुणीच्या आहार नळीत एक रुपयाचे नाणे सुमारे 13 वर्षांपासून अडकलेले होते. आता तिचे ऑपरेशन करुन‍ नाणं काढण्यात आले आहे. आर्श्याची बाब म्हणजे 13 बर्षांपर्यंत तरुणीला कुठलाही त्रास जाणवला नाही तिचं आहार देखील सुरळीत होतं.
 
इंदौर रहिवासी 21 वर्षीय तरुणी कुटुंबासह उज्जैन येथील खाजगी रुग्णालयात पोहचली. डॉक्टरांनी तपास केल्यानंतर तिच्या फूड पाईपजवळ 1 रुपायाचे नाणे अडकलेले दिसले. तेव्हा डॉक्टरांनी सर्जरी करण्याचा सल्ला दिला. नंतर यशस्वीरीत्या ऑपरेशन करुन नाणं काढण्यात आलं.
गले के नीचे आहार नली में फंसा था एक का सिक्का
 
मुलगी 8 वर्षांची असताना तिच्या गळ्यात नाणं अडकलं होतं. 13 वर्ष ती मजेत होती आता वयाच्या 21 व्या वर्षी ती नाणं काढवण्यासाठी डॉक्टरांकडे पोहचल्याने सर्व हैराण झाले.
 
21 वर्षीय नाजमीनचे वडील फारूक इंदौरमध्ये मजुरी करतात. त्यांनी सांगितले की लहानपणी ती हठ्ठ करत होती तेव्हा त्यांनी तिला चॉकलेटसाठी 1 रुपयाचा शिक्का दिला होता तेव्हा तिने तो तोंडात टाकला आणि गिळून घेतला होता. नंतर उलट्या झाल्या आणि ती बरी होती तेव्हा आम्हाला वाटलं की नाणं निघून गेले असावं नंतर मुलीला कधी वेदना देखील झाल्या नाही म्हणून 13 वर्ष आम्ही याकडे लक्ष दिले नाही मात्र आता कळले की नाणं तर अजून अडकलेले होते तेव्हा ऑपरेशन करवण्यात आले.
 
मुलीचं वजन कमी होत असल्यामुळे एक दोन जागी एक्स-रे सोनोग्राफी करवण्यात आल्यावर गळ्याखाळी अन्न नलिकामध्ये काही पदार्थ अडकलेले जाणवले नंतर ही घटना आठवली आणि लगेच ऑपरेशन करवले.