शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

इस्रोकडून पीएसएलव्ही सी-37 च्या विक्रमाचे रेकॉर्डिंग प्रसिद्ध

सात देशांचे104 उपग्रह घेऊन भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने विश्वविक्रम केला. या ऐतिहासिक विक्रमाचे रेकॉर्डिंग पीएसएलव्ही सी-37 ने केले असून त्याचा व्हिडिओ इस्रोनं प्रसिद्ध केला आहे. 
 
यानातून अवकाशात गेलेल्या 104 नॅनो उपग्रहांचं नेमकं झालं काय हे पाहता येणार आहे. आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी वेळी ‘पीएसेलव्ही-37’ अग्निबाणाने या 104 उपग्रहांना कवेत घेऊन अचूक उड्डाण केले. द्रवरूप आणि घन इंधनांच्या चार इंजिनांच्या रेट्याने पुढील अवघ्या 17 मिनिटांत हा अग्निबाण अंतराळात 500 किमी उंचीवर पोहोचला. त्यानंतरच्या काही मिनिटांत अग्निबाणात विविध कप्प्यांमध्ये खुबीने ठेवलेल्या 104 उपग्रहांचे त्यांच्या पूर्वनिर्धारित कक्षांमध्ये एका पाठोपाठ एक अचूकतेने प्रक्षेपण करण्यात आले.