गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 15 फेब्रुवारी 2017 (11:14 IST)

इस्रोचा विश्वविक्रम, एकाच वेळी 104 उपग्रह अंतराळात सोडले

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात पाठविण्याचा विक्रम केला आहे. PSLV- C37 या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत.

चेन्नईपासून १२५ कि.मी. अंतरावरील श्रीहरिकोटा येथून बुधवारी सकाळी एकाच वेळी १०४ उपग्रह पाठवून भारत अशा प्रकारची कामगिरी करणारा जगातील पहिला देश ठरला आहे.

पीएसएलव्हीने २१४ किलो वजनाच्या कार्टोसॅट-२ साखळीतील उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे. त्याचा उपयोग पृथ्वीवर देखरेख ठेवण्यासाठी केला जाईल. त्यानंतर १०३ सहयोगी उपग्रहांना पृथ्वीपासून ५२० कि.मी. अंतरावरील कक्षेत समाविष्ट केले जाईल. त्यांचे एकूण वजन ६६४ आहे. यातील ९६ उपग्रह अमेरिकेचे आहेत, तर पाच उपग्रह हे इस्रोचे आंतरराष्ट्रीय ग्राहक इस्रायल, कजाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिरातचे आहेत.