गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 27 डिसेंबर 2023 (10:46 IST)

J&K: श्रीनगर-बारामुल्ला महामार्गावर IED बॉम्ब आढळला ,परिसरात हाय अलर्ट

J&K:जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी सातत्याने हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, खोऱ्यातील श्रीनगर-बारामुल्ला महामार्गावर सापडलेल्या एका संशयास्पद वस्तूची ओळख पटली आहे. लवीपोरा भागात आयईडी बॉम्ब सापडल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर परिसरात दहशतीचे वातावरण असून संपूर्ण परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आयईडी बॉम्ब निकामी करण्यासाठी बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी गेले असून बॉम्ब निकामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतर लष्कर खोऱ्यात हाय अलर्टवर आहे. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सातत्याने शोधमोहीम राबवली जात आहे.
 
दरम्यान, 24 डिसेंबर रोजी मशिदीत अजान देत असताना दहशतवाद्यांनी निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली होती. बारामुल्ला जिल्ह्यातील जेंटमुल्ला भागात ही घटना उघडकीस आली आहे. निवृत्त एसएसपी मोहम्मद शफी मशिदीत फजरची अजान देत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

या घटनेपूर्वी 21 डिसेंबर रोजी पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला होता. ज्यामध्ये 4 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्री सकाळी 11.30 वाजता जम्मूला पोहोचतील. त्यानंतर ते राजौरी येथे जातील. यावेळी ते हल्ल्याच्या ठिकाणाचीही पाहणी करणार आहेत.

Edited By- Priya DIxit