1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (09:51 IST)

J&K: CISF जवानांनी भरलेल्या बसवर दहशतवादी हल्ला, एएसआय शहीद; दोन सैनिक जखमी

J&K: Terrorist attack on a bus full of CISF personnel
जम्मू-काश्मीरमधील चड्ढा कॅम्पजवळ शुक्रवारी पहाटे 4.15 वाजता दहशतवाद्यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ने भरलेल्या बसवर हल्ला केला. ज्यामध्ये एक एएसआय शहीद झाला असून दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत.  
 
सीआयएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बसमध्ये 15 जवान होते, सर्वजण सकाळच्या शिफ्टमध्ये ड्युटीसाठी जात होते. दरम्यान, घातपाती दहशतवाद्यांनी बसवर हल्ला केला. सीआयएसएफने दहशतवादी हल्ल्याचा अथक सामना केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक एएसआय शहीद झाला तर दोन जण जखमी झाले. 
 
या चकमकीत एक जवान शहीद
झाला, तर आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला असून चार जवान जखमी झाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, जम्मूच्या सुंजवान भागात ही चकमक सुरू आहे. जम्मू झोनचे एडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, नाकाबंदी करून परिसर रिकामा करण्यात आला आहे. चकमक सुरूच आहे. घरात दहशतवादी लपून बसल्याचे दिसत आहे. 
 
महत्त्वाची बाब म्हणजे पंतप्रधान मोदींचा जम्मू-काश्मीर दौरा दोन दिवसांनी आहे. 24 व्या पंचायती राज दिनी पंतप्रधान मोदी पल्ली गावात जाणार आहेत. दोन दिवसांपूर्वी सुरक्षा दलांनी भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर (IB) हिरानगर सेक्टरमधून पाच संशयितांना पकडले होते. चौकशीनंतर यातील दोघांना जम्मूला पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी बुधवारी पहाटे सीमेला लागून असलेल्या गावांमध्ये छापे टाकून संशयितांना बॅग आणि कागदपत्रांसह पकडले.