जगदिश सिंह केहर यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती
आपल्या देशातील असलेले सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती जगदिश सिंह केहर यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपदी प्रणव मुखर्जी केहर यांना 4 जानेवारी 2017 रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ देणार आहेत.
न्यायमूर्ती केहर देशाचे 44 वे सरन्यायाधीश होणार आहेत. 4 जानेवारी 2017 ते 4 ऑगस्ट 2017 हा केहर या कालावधीसाठी ते पदावर राहणार आहेत. सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्यानंतर केहर सरन्यायाधीशपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्त झालेले ते पहिलेच शीख ठरणार आहेत.