गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 13 एप्रिल 2023 (13:35 IST)

Atiq Ahmed अतीक अहमदचा मुलगा असदचा पोलिसांकडून एन्काऊंटर

लखनौ- यूपी एसटीएफने शुक्रवारी झाशीमध्ये अतिक अहमदचा मुलगा असद याला चकमकीत ठार केले. उमेश पाल हत्येप्रकरणी असदवर 5 लाखांचे बक्षीस होते. असे सांगितले जात आहे की, शुक्रवारी यूपी एसटीएफने असदसोबत एन्काउंटर केले होते. दोन्ही बाजूंनी गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये असद आणि त्याचा साथीदार गुलाम मारला गेला. मीडिया रिपोर्ट्सनुसार पोलिसांनी असद आणि गुलाम यांच्याकडून अत्याधुनिक विदेशी शस्त्रे जप्त केली आहेत.
 
24 फेब्रुवारी रोजी प्रयागराजच्या रस्त्यावर उमेश पालच्या दिवसाढवळ्या हत्येनंतर असद अहमद यूपीचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार बनला होता. असाद अर्धा डझन शूटर्सचे नेतृत्व करत असल्याचा पोलिसांना संशय होता. त्याच्यावर पाच लाखांचे बक्षीस होते. या प्रकरणी अतिकची पत्नी शाइस्ता हिचाही पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी अतिक अहमदला अहमदाबादच्या साबरमती कारागृहातून प्रयागराजला आणण्यात आले असून न्यायालयात हजर केले गेले.