शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: श्रीनगर , बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (16:48 IST)

Jammu-kashmir Encounter: दहशतवाद्यांचा खात्मा सुरूच, पुलवामा चकमकीत जैशचा प्रमुख कमांडर शाम सोफी ठार

खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा सुरू आहे. बुधवारी सुरक्षा दलाने पुलवामाच्या त्राल भागात झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा कमांडर शाम सोफीला ठार केले. दहशतवाद्यांशी चकमक अजूनही सुरू आहे. लष्कर आणि पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. शोधमोहीम सुरू आहे. जम्मू -काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी जैश कमांडरच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. गेल्या तीन दिवसात आठ दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले आहे.
 
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोराच्या त्राल भागातील तिलवानी मोहल्ला वगगडमध्ये दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तेथे घेराव आणि शोध मोहीम सुरू केली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर ऑपरेशन चकमकीत बदलले. सुरक्षा दलाच्या प्रत्युत्तरादाखल एक दहशतवादी ठार झाला. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, दहशतवाद्याची ओळख जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख कमांडर शाम सोफी आहे. त्यांनी ट्विट केले, 'जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख कमांडर शाम सोफी चकमकीत ठार झाला.'