जम्मू काश्मीर : चकमकीत 4 दहशतवादी ठार, 1 ला अटक
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या तीन वेगवेगळ्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद (JeM) च्या पाकिस्तानी कमांडरसह चार दहशतवादी ठार झाले आणि आणखी एकाला अटक करण्यात आली. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, काश्मीर खोऱ्यातील पुलवामा, गंदरबल आणि कुपवाडा जिल्ह्यात ही चकमक झाली. ते म्हणाले की, दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील चेवाकलन भागात रात्रभर झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद (जेईएम ) चे दोन दहशतवादी आणि एक पाकिस्तानी नागरिक ठार झाला.
काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ट्विट केले की, “पुलवामा चकमकीत ठार झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचे नाव JeM कमांडर कमल भाई 'जट' असे आहे. तो 2018 पासून पुलवामा-शोपियन भागात सक्रिय होता आणि अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये आणि नागरी अत्याचारांमध्ये त्याचा सहभाग होता.
शनिवारी पहाटे मध्य काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील सेराच भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आणखी एक चकमक झाली, असे अधिकाऱ्याने सांगितले. गोळीबारात लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी ठार झाल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवारा येथील नेचमा राजवार भागात सकाळी आणखी एक चकमक झाली ज्यामध्ये लष्कराचा एक दहशतवादी मारला गेला, असे त्यांनी सांगितले. कुमार म्हणाले की, सुरक्षा दलांनी चार-पाच ठिकाणी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली आहे.त्यांनी ट्विट केले की, आम्ही काल रात्री 4-5 ठिकाणी संयुक्त कारवाई सुरू केली. आतापर्यंत, पुलवामा, गांदरबल येथे एका पाकिस्तानीसह दोन जेईएम दहशतवादी आणि हंदवाडा येथे लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी मारला गेला आहे. हंदवाडा आणि पुलवामा येथे चकमक संपली. "एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे," असे आयजीपी म्हणाले.