मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 12 मार्च 2022 (16:48 IST)

आमदाराच्या कारने अनेकांना चिरडले,22 जखमी

ओडिशाच्या खुर्दा जिल्ह्यातून शनिवारी मोठी बातमी समोर आली आहे. येथील बाणापूरमध्ये बीजेडीचे निलंबित आमदार प्रशांत जगदेव यांच्या गाडीचा ताबा सुटला आणि यांच्या वाहनाने जमावाला धडक दिल्याने 7 पोलिसांसह 22 जण जखमी झाले आहे. चिल्काचे आमदार जगदेव देखील जखमी झाले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, ब्लॉक अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान बीडीओ बाणापूरच्या कार्यालयाबाहेर जमलेल्या जमावाला जगदेव यांचा वाहनाने धडक दिली. या मध्ये बाणापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सह दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांना भूवनेशवर एम्स मध्ये नेण्यात आले.
 
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “सुमारे 15 भाजप कार्यकर्तेसह सात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. त्यानंतर संतप्त जमावाने आमदार जगदेव यांचावर हल्ला करून वाहनाची तोडफोड केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून जमावाला पांगवले. जखमी जगदेव यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.