शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (11:19 IST)

दिल्ली: गोकुळपुरी गावातील झोपडपट्ट्यांना भीषण आग, बर्‍याच जणांचा मृत्यू, 60 हून अधिक झोपड्या जळाल्या

fire accident
ईशान्य दिल्लीतील गोकुळपुरी गावातील झोपडपट्टीला पहाटे एकच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर 60 हून अधिक झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आली. अजूनही कूलिंगचे काम सुरू आहे. मात्र, दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार 30 झोपडपट्ट्यांना आग लागली आहे.
 
दिल्ली अग्निशमन सेवेने सांगितले की, 'गोकुळपुरी भागातील झोपडपट्टीला काल रात्री लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला. आग आटोक्यात आणण्यात आली आहे. अग्निशमन दलाने सात मृतदेह बाहेर काढले.