शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 11 मार्च 2022 (16:59 IST)

सीबीएसई इयत्ता 10वी आणि 12वी टर्म 2 च्या परीक्षा 26 एप्रिलपासून होणार, तारीख पत्रक येथे पहा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 10वी आणि 12वीच्या टर्म-2 परीक्षेची घोषणा केली आहे. ही बोर्ड परीक्षा 26 एप्रिलपासून ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.सीबीएसई  अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. देशातील कोविड-19 ची परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
टर्म-2 परीक्षा फक्त ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल. सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी ही माहिती दिली. 26 एप्रिल 2022 पासून लेखी परीक्षा सुरू होणार आहेत. त्याच बरोबर 10वी आणि 12वी चे डेटशीट देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 10वी आणि 12वीच्या टर्म 2 च्या परीक्षेसाठी तारीखपत्रक ( CBSE डेटशीट वर्ग 12 ) जारी केले आहे. CBSE टर्म 2 ची परीक्षा उर्वरित 50% अभ्यासक्रमासाठी घेतली जाईल. प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ अशा दोन्ही प्रकारचे प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी २ तासांचा असेल. 10वी आणि 12वी दोन्ही परीक्षा ( CBSE टर्म 2 परीक्षा ) सकाळी 10:30 पासून सुरू होतील आणि परीक्षा फक्त एका शिफ्टमध्ये घेतली जाईल. सीबीएसईच्या परीक्षा देशातील विविध शहरांतील परीक्षा केंद्रांवर घेतल्या जातील.
 
विद्यार्थी खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून 12वीची तारीखपत्रक डाउनलोड करू शकतात.