शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 10 मार्च 2022 (23:50 IST)

रेल्वेने प्रवाशांना दिला मोठा दिलासा,ब्लँकेट आणि बेडशीट सुविधा सुरू करण्याचे आदेश

कोरोनाच्या काळात ट्रेनमध्ये बेडशीट, ब्लँकेट आणि पडदे यांची सुविधा बंद करण्यात आली होती. रेल्वे पुन्हा एकदा ते सुरू करणार आहे. गुरुवारी ही सुविधा तातडीने सुरू करण्याचे आदेश रेल्वेने दिले आहेत. ब्लँकेट आणि बेडशीट न मिळाल्याने लोकांची खूप मागणी होती. या अगोदर पुन्हा जेवणासह अनेक सुविधा सुरू झाल्या आहे.
 
रेल्वे प्रवाशांसाठी गुरुवारी रेल्वेकडून मोठा दिलासा जाहीर करण्यात आला आहे. प्रवाशांना दिलासा देत, भारतीय रेल्वेने गाड्यांमध्ये बेडशीट, ब्लँकेट आणि पडदे देण्याची सेवा पुन्हा सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे कोरोनाच्या काळात या सुविधा बंद करण्यात आल्या होत्या. 
 
रेल्वे बोर्डाने सर्व रेल्वे झोनच्या महाव्यवस्थापकांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, या वस्तूंचा पुरवठा त्वरित प्रभावाने पुन्हा सुरू करण्यात यावा. सीलबंद कव्हरमध्ये उशा, ब्लँकेट, चादरी आणि टॉवेल यांचा समावेश असेल. या अगोदर पुन्हा जेवणासह अनेक सुविधा सुरू झाल्या आहेत.
 
रेल्वेने, अन्न सेवा आणि ट्रेनवरील तिकिटावरील बहुतेक सवलती निलंबित केल्या होत्या, त्यांनी यापैकी बहुतेक सुविधा पुन्हा सुरू केल्या आहेत. मात्र, प्रवाशांच्या तिकिटावरील सवलती स्थगित आहेत.
 
ब्लँकेट आणि बेडशीट न मिळाल्याने लोक दीर्घकाळापासून मागणी करत होते. या सुविधा मिळत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. असे अनेक लोक होते ज्यांना ट्रेनमध्ये या सर्व सुविधा न मिळाल्याने विमानाने प्रवास करण्यास प्राधान्य देऊ लागले.सध्या ट्रेनच्या एसीच्या आणि विमानाच्या भाड्यात फारसा फरक नाही.