मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 9 मार्च 2022 (21:14 IST)

होळी सणानिमित्त विशेष ट्रेन धावणार; पाहा संपुर्ण यादी

होळी सणानिमित्त मध्य रेल्वे मुंबई ते मउ/ करमळी / दानापूर तसेच पुणे आणि करमळी दरम्यान १४ अतिरिक्त विशेष ट्रेन सोडणार आहे. १४ अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांची गर्दितुन सुटका होणार आहे. तसेच प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान या विशेष ट्रेन नेमक्या कोणत्या ते पाहूयात…
 
मुंबई-मऊ (२ फे-या)
ट्रेन क्रमांक 01009 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस दिनांक १५.३.२०२२ रोजी १४.१५ वाजता सुटेल आणि मऊ येथे दुसऱ्या दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01010 विशेष गाडी दि. १७.३.२०२२ रोजी १६.५५ वाजता मऊ येथून सुटेल आणि तिसर्‍या दिवशी ०३.३५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
 
थांबा:
कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, हरदा, इटारसी, राणी कमलापती, बिना, ललितपूर, टिकमगड, खरगापूर, छतरपूर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकुटधाम कारवी, माणिकपूर, प्रयागराज, ज्ञानपूर रोड, वाराणसी आणि औंरीहर.
 
संरचना: १ द्वितीय वातानुकूलित, ८ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, ४ द्वितीय आसन.
 
पुणे- करमळी (४ फे-या)
ट्रेन क्र.01011 विशेष दि. ११.३.२०२२ आणि १८.३.२०२२ रोजी पुणे येथून १७.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०८.०० वाजता करमाळीला पोहोचेल.
 
ट्रेन क्र.01012 विशेष गाडी दि. १३.३.२०२२ आणि २०.३.२०२२ रोजी करमाळी येथून ०९.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २३.३५ वाजता पुण्याला पोहोचेल.
 
थांबा :
लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि.
 
संरचना: १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ६ द्वितीय आसन.
 
पनवेल- करमळी ( ४ फे-या)
ट्रेन क्र.01013 विशेष दि. १२.३.२०२२ आणि १९.३.२०२२ रोजी पनवेल येथून २२.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०८.०० वाजता करमळीला पोहोचेल.
 
ट्रेन क्र.01014 विशेष दि. १२.३.२०२२ आणि १९.३.२०२२ रोजी करमळी येथून ०९.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी पनवेल येथे २०.०० वाजता पोहोचेल.
 
थांबा :
रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि.
 
संरचना: १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ६ द्वितीय आसन.
 
मुंबई- दानापूर ( ४ फे-या)
ट्रेन क्र.01015 विशेष दि. १५.३.२०२२ आणि २२.३.२०२२ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी १०.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दानापूर येथे १७.१५ वाजता पोहोचेल.
 
ट्रेन क्र.01016 विशेष दि. १६.३.२०१२ आणि २३.३.२०२२ रोजी दानापूर येथून २०.२५ वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ०३.३५ वाजता पोहोचेल.
 
थांबा :
कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
 
संरचना: १ द्वितीय वातानुकूलित, ८ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, ४ द्वितीय आसन.
 
आरक्षण
पूर्णपणे आरक्षित विशेष ट्रेन क्रमांक 01009, 01011/01012, 01013/01014 आणि 01015 यांचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. १०.३.२०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अप डाउनलोड करा.