शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 27 फेब्रुवारी 2022 (15:35 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने केले अल्पवयीन मुलीचे विनयभंग

भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथे अल्पवयीन मुलीचे विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका होस्टेलच्या संचालकाने इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे विनयभंग केले. हा आरोपी एका हॉस्टेलचा संचालक असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता आहे. सुमेध श्यामकुवर असे या आरोपीचे नाव आहे. 
 
आरोपीने पीडित मुलीला हॉस्टेलमध्ये सोडण्याच्या बहाणा करत तिच्या सोबत लैंगिक चाळे केले . पीडित मुलगी भंडाऱ्यातील एका महिला समाज गर्ल्स हॉस्टेल मध्ये राहते. 25फेब्रुवारी रोजी सदर आरोपी पीडित मुलीच्या घरी गेला. आणि तुला हॉस्टेलवर सोडतो असं म्हटलं. आरोपी स्वतः त्या हॉस्टेल चा संचालक आहे. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत मुलीला त्याच्या सह पाठविले. आरोपीने तिला आपल्या कारमध्ये मुलीला नेले आणि हॉस्टेल वर जाताना कार एका निर्जनस्थळी थांबवून मुलीसह लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीने घडलेला प्रकार हॉस्टेल मधल्या आपल्या एका मैत्रिणीला सांगितलं. त्यानंतर  पीडितेच्या वडिलांना फोन करून घडलेले सांगितले.
 
वडिलांनी आरोपीच्या विरोधात आंधळगावच्या पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी आरोपी हॉस्टेल संचालक आणि राष्ट्रवादीचे नेते श्याम कुवर यांच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा  तपास पोलीस लावत असून अद्याप आरोपीला अटक केले नाही. या घटनेमुळे शाळा परिसरात खळबळ उडाली आहे.