गुरूवार, 23 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 27 फेब्रुवारी 2022 (11:37 IST)

राज्याचे मंत्रिमंडळ पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्यांचं, आशिष शेलार यांची टीका

Ashish Shelar criticizes state cabinet for supporting Pakistanराज्याचे मंत्रिमंडळ पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्यांचं
राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं मंत्रिमंडळ हे पाकिस्तानी समर्थकांचं असल्याची टीका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे.
 
बॉम्बस्फोटातील आरोपींनी 30 कोटी किंमत असलेली जागा 20 लाखांत विकली आणि त्याची खरेदी राज्य सरकारच्या मंत्र्यांनी केली. त्यामुळं पाकिस्तानातून रसद घेऊन भारतावर हल्ला करणाऱ्यांच्या समर्थकांचं मंत्रिमंडळ असल्याचं शेलार म्हणाले.
 
बॉम्बस्फोट करणाऱ्या शहावली खाननं हसीना पारकरच्या हस्तकाच्या मदतीने जागा बळकावली. ज्याच्याशी करार झाला तो आजन्म तुरुंगात आहे. मग करारावर एवढ्या सह्या कशा झाल्या. जेलमधला माणूस बाहेर कसा आला? असे प्रश्नही शेलारांनी उपस्थित केले.
 
राज्याचे मंत्री असलेल्या नवाब मलिकांनी दाऊदच्या बहिणीशी सलगी केली. त्यांनी बॉम्बस्फोटासाठी त्यांचा पैसा वापरायला दिला असा गंभीर आरोपही शेलारांनी केला.
 
धर्माचा दाऊदशी सबंध लावणं योग्य नसल्याचं पवार म्हणतात. पण हिंदु आतंकवादाशी सबंध लावणं तुमच्या डोक्यातून निघालं, असं म्हणत शेलारांनी पवारांवरही टीका केली.