शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 27 फेब्रुवारी 2022 (11:33 IST)

साहित्यिक डॉ.सुहास जेवळीकर यांचे निधन

सुप्रसिद्ध साहित्यिक आणि औरंगाबादातील शासकीय वैधकीय महाविद्यालयाचे भूलतज्ज्ञ विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ.सुहास जेवळीकर यांचे वयाच्या 66 व्या वर्षी काल रात्री निधन झाले.  ते काही दिवसापासून आजारी होते. त्यांना राज्य शासनाचा वाङ्मयीन पुरस्कार, इंदिरा संत पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 
 
डॉ. जेवळीकर हे मराठीतील प्रख्यात लेखक होते. त्यांनी एमबीबीएस, एमडीचे शिक्षण औरंगाबाद शासकीय महाविद्यालयातून घेतले होते. याच महाविद्यालयातून ते भूलतज्ज्ञ विभागाचे विभाग प्रमुख होते आणि नंतर त्या पदावरून सेवा निवृत्त झाले. 
 
डॉ.जेवळीकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना काल रात्री त्यांची प्राण ज्योत माळवली.
त्यांच्या ऐरणीच्या देवा, सभोवार ,स्वास्थ संवाद, दहशतीची दैनंदिनी , तिरीप या काही पुस्तके प्रकाशित झाल्या आहे.  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.