शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 28 मे 2017 (20:32 IST)

जम्मू-काश्मीर : मोबाईल इंटरनेट सेवा पुन्हा बंद

बारा तासांपूर्वी सुरू केलेली मोबाईल इंटरनेट सेवा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय जम्मू-काश्मीर सरकारला घ्यावा लागला आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमद याला भारतीये सैन्याने कंठस्नान घातल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका असल्याने जम्मू-काश्मीर सरकारने पुन्हा इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेतला. गेल्या महिनाभरापासून तेथे इंटरनेट सेवा बंद होती. एकुण 22 सोशल नेटवर्किंग साइट तेथे एक महिन्यासाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. इंटरनेट सेवा बंद करण्याचं कोणतंही कारण सरकारकडून देण्यात आलं नाही आहे. तसंच कधीपर्यत इंटरनेट बंद असेल, या बद्दलचीसुद्धा कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.