जवान निशत्र नव्हते, गोळी चालवायची नाही हे ठरले होते
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारला गलवान खोर्यात भारतीय जवानांना निःशत्र पाठविण्यावरून विचारलेल्या प्रश्नाला परराष्ट्र व्यवहार मंत्री एस, जयशंकर यांनी उत्तर दिले आहे. गलवानमध्ये 15 जूनला जवानांकडे हत्यारे होती. ही हिंसक मारामारी झाली त्यावेळी हत्यारांचा उपयोग करायचा नाही, असे दोन्हीकडील पक्षांमध्ये ठरलेले होते, असे उत्तर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिले आहे. सन 1996 आणि 2005 मध्ये दोन्ही देशांदरम्यान झालेल्या करारानुसार हत्यारांचा उपयोग करायचा नाही हे ठरले होते, असेही जयशंकर म्हणाले. सीमेवर तैनात असलेल्या जवानांकडे नेहमीच हत्यारे असतात. ते जेव्हा आपली चौकी सोडतात तेव्हाही त्यांच्या हातात हत्यारे असतात, असेही ते राहुल गांधी आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना म्हणाले.
एका ट्विटद्वारे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राहुल गांधींना उत्तर दिले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, जे सत्य आहे ते व्यवस्थित समजून घेण्याची गरज आहे. सीमेवर जेवढे सैनिक तैनात असतात, त्या सर्वांकडे शत्रे असतात, विशेषतः चौकीवरून निघताना. 15 जून या दिवशी गलवान खोर्यात तैनात असलेल्या सर्वच सैनिकांकडे हत्यारे होती. चीनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक हाणामारीच्या वेळी हत्यारांचा उपयोग का केला गेला नाही हे या ट्विटद्वारे परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. शत्रसंधीच्या वेळी हत्यारांचा उपयोग न करण्याची दीर्घ (सन 1966 आणि 2005 चे करार) परंपरा असल्याचेही ते म्हणाले.