मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जून 2020 (13:56 IST)

LACवर भारतीय आणि चिनी सैनिक यांच्यात हिंसक चकमक, एक भारतीय लष्कराचा अधिकारी आणि दोन सैनिक शहीद

लडाखच्या गॅलवान व्हॅलीमध्ये भारत-चीन सैन्याच्या दरम्यान झालेल्या हिंसक चकमकीत तीन भारतीय जवानांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लष्कराच्या अधिकार्‍याचा समावेश आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली. सूत्रांच्या माहितीनुसार काही चिनी सैनिकही मारले गेले आहेत. तथापि, चीनने याची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. दोन्ही बाजूंनी दगडांचा वापर केला गेला आहे. भारत-चीन सीमेवर सैनिक ठार झाल्याची 1975 नंतरची ही पहिलीच वेळ आहे.
 
गेल्या दीड महिन्यांपासून भारत आणि चीनचे सैन्य लडाखमध्ये लढत आहेत. चिनी सैनिक मोठ्या संख्येने येथे आले होते. दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरू होती. दोन्ही देशांकडून सैन्य माघार घेतल्याच्या बातम्या आल्या असून हा तणाव लवकरच संपेल असा विश्वास होता.
 
वृत्तसंस्था एनएनआयच्या वृत्तानुसार, सोमवारी रात्री लडाखच्या गालवान खोर्‍यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक झुंज झाली. यात भारतीय सैन्य दलातील एक अधिकारी आणि दोन सैनिक ठार झाले. दोन्ही देशांचे सैन्य उच्च अधिकारी घटनास्थळावर बोलणी करून परिस्थिती हाताळण्यात गुंतले आहेत.
 
अधिकार्‍यांनी सांगितले की भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी मंगळवारी यांचा पठाणकोटचा प्रस्तावित दौरा रद्द केला आहे . या प्रकरणाशी संबंधित लोक म्हणाले की, भारताच्या शहीद सैनिकांमध्ये कर्नलचादेखील समावेश आहे.
 
5 मे रोजी पांगोंग सो परिसरात भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये हिंसक चकमक झाली, त्यानंतर दोन्ही बाजू आमनेसामने असून आणि गतिरोध कायम राहिला. 2017 च्या डोकलाम घटनेनंतरची ही सर्वात मोठी लष्करी अडचण ठरली होती. 6 जून रोजी झालेली चर्चा: दोन देशांमधील सध्याच्या तणावाबाबत आतापर्यंतची उच्चस्तरीय चर्चा  होती .