रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 8 जून 2018 (16:20 IST)

कोरेगाव भीमा हिंसाचार, आणखी ४ आरोपींची छायाचित्रे जारी

राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीने  कोरेगाव भीमा हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी आता आणखी चार आरोपींची छायाचित्रं जारी केली. कोरेगाव भीमा हिंसाचारात राहुल फटांगडेचा मृत्यू झाला होता. या हत्येप्रकरणी अहमदनगरच्या श्रीगोंदा इथून 3 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता सीआयडीने आणखी चार नव्या आरोपींची छायाचित्रं आणि चल चित्र जारी केली. या तीनही आरोपींबद्दल माहिती देण्याचं आवाहन सीआयडीने केलं आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी अटक करण्यात आलेल्या तिघांनीही राहुलची हत्या केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला होता.पोलिसांनी  केलेल्या कारवाईनंतर एकूण आठ जणांना अटक केली होती. त्यात राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी तिघांना तर उर्वरित पाच जणांना सणसवाडीतल्या हिंसाचाराप्रकरणी अटक करण्यात आली होती.