बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 29 जुलै 2020 (10:47 IST)

5 सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली 3 मजली इमारत

मुसळधार पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यानंतर कर्नाटकातील बंगळुरू इथे मोठी दुर्घटना घडली आहे. निर्माणाधीन इमारतीचं बांधकाम सुरू असलेल्या मागच्या बाजूला तीन मजली इमारत अचानक कोसळून मोठी दुर्घटना घडली. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
 
बांधकाम सुरू असेलेल्या मागच्या बाजूला तीन मजली इमारत कोसळली आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता ही संपूर्ण इमारत The building एका विशिष्ट अँगलनं खाली कोसळली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये देशातील अनेक भागांमध्ये पावसानं धुमशान सुरू असल्यानं कुठे भूस्खलन तर कुठे इमारत कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात काम सुरू होतं. दरम्यान या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. आजूबाजूला सुरू असणाऱ्या कामामुळे ही इमारत कोसळली का असा सवालही उपस्थित केला जात आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही इमारत नेमकी कशामुळे कोसळली याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.