गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 10 जून 2019 (12:00 IST)

कठुआ बलात्कार प्रकरण: 7 पैकी 6 जण दोषी

17 महिन्यानंतर जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे आठ वर्षांच्या मुलीवर झालेला बलात्कार आणि तिच्या खूनप्रकरणाचा निकाल लागला आहे. या प्रकरणात विशेष न्यायालयाने सातमधून सहा आरोपींना दोषी सिद्ध केले आहे. या प्रकरणात गावाचे प्रमुख सांजी राम, त्याचा अल्पवयीन भाचा, विशेष पोलिस अधिकारी दीपक खजुरिया आणि सुरेंदर वर्मा, हेड कॉन्स्टेबल टिळक राज आणि उपनिरीक्षक आनंद दत्ता दोषी सिद्ध झाले.
 
या प्रकरणाची इन-कॅमेरा सुनावणी तीन जून रोजी पूर्ण झाली होती तेव्हा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तेजविंदरसिंग यांनी दहा जून रोजी निकाल देऊ असे सांगितले होते. या दरम्यान न्यायालयाच्या आवारात सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला होते. 
 
या प्रकरणी पंधरा पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले होते त्यानुसार गेल्या वर्षी 10 जानेवारी रोजी मुलीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार आणि नंतर तिचा खून करण्यात आला. 
 
पठाणकोटमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयात गेल्या वर्षी जून महिन्यापासून या प्रकरणावर दररोज सुनावणी झाली.