केडगाव हत्या प्रकरण पोलिसांना व्हिडियो मिळाला
केडगाव दुहेरी हत्याकांडातील मृत्यू झालेल्या एकाचा गळा कापतानाचा व्हिडीओ पोलिसांना मिळाला आहे. त्या व्हिडीओची सीडी निनावी पत्राद्वारे पोलिसांना पाठविली होती. त्यामुळे हा भक्कम पुरावा म्हणून त्याचा दोषारोपपत्रात समावेश केला आहे. व्हिडीओ हत्याकांडात महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे. यामध्ये पुढील तपासासाठी सीआयडीने पाच पथके तैनात केली आहेत. राजकीय वादातून ७ एप्रिल रोजी केडगावात शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे या दोघांची हत्या करण्यात आली होती. संदीप गुंजाळ जखमी अवस्थेतील एकाचा खून करतानाचा व्हिडीओ आहे. केडगाव दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी संदीप गुंजाळ हा या घटनेतील मास्टर माईंड ठरला आहे. गुन्हा करण्यापुर्वी व केल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी त्याने अधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केला आहे. तर गुन्ह्यात त्याचे सहआरोपी कसे सुटतील यासाठी त्याने शक्कल लढविली आहे. तसेच पिस्तूल, तलवारी, कोयते अशा हत्यारांची निगा कशी राखायची हे त्याने युट्युबवर पाहुन कृती केली आहे. तसेच गुन्हे कोणत्या प्रकारचे व कसे असतात पुरावे नष्ट कसे करायचे याचा अभ्यास देखील त्याने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.