सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (23:11 IST)

KOLKATA:भारतीय संग्रहालयात सीआयएसएफ जवानाने AK-47 ने गोळीबार केला, एक साथीदार ठार; दुसरा जखमी

KOLKATA: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील भारतीय संग्रहालयात शनिवारी एका CISF जवानाने आपल्या दोन साथीदारांवर गोळ्या झाडल्या.गोळ्या घालण्यासाठी जवानाने आपले सर्व्हिस हत्यार  AK-47 वापरले.या घटनेत एका सहकारी जवानाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.AK-47 ची गणना धोकादायक शस्त्रांमध्ये केली जाते.
 
साथीदारांवर गोळी झाडल्यानंतर सीआयएसएफ जवान आतमध्ये होता. गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूचे अनेक लोक जमा झाले.जखमी जवानाला रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्याचवेळी पोलिसांनी आरोपी सीआयएसएफ जवानाला अटक केली आहे.घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
 
 CISF ने भारतीय संग्रहालयाची सुरक्षा ताब्यात घेतली.सीआयएसएफ जवानाने आपल्या सहकारी जवानावर गोळीबार का केला हे अद्याप समजू शकलेले नाही.तिघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला होता की आणखी काही कारण होते?सध्या पोलिसांनी आरोपी जवानाला पकडून आपल्यासोबत नेले आहे.