शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

नवे मुख्यमंत्री कुमारस्वामी 'या' बंगल्यात राहणार नाही

कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी  मुख्यमंत्र्यांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानामध्ये न राहण्याचा निर्णय घेतलाय. वास्तूशास्त्रावर प्रचंड विश्वास असलेल्या कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान म्हणून सध्याच्या मुख्य सचिव के.रत्नप्रभा बंगला निवडला आहे. मुख्यमंत्री निवासस्थान शापित असल्याची कुमारस्वामी यांची अंधश्रद्धा आहे. या निवासस्थानात जे राजकारणी मुख्यमंत्री म्हणून निवडून आले होते त्यातील एकालाही कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही.
 
कर्नाटकताली मुख्यमंत्र्यांने अधिकृत निवासस्थान म्हणून 'अनुग्रह' हा आलिशान बंगला बांधण्यात आला आहे. कुमारस्वामी यांचे वडील एचडी देवेगौडा हे पहिले मुख्यमंत्री होते ज्यांनी या बंगल्यामध्ये मुक्काम केला होता. डिसेंबर १९९४ ते मे १९९६ या कार्यकाळासाठीच त्यांना मुख्यमंत्रीपद उपभोगता आले, त्यानंतर पंतप्रधान बनल्याने त्यांना पद आणि बंगला दोन्ही सोडावे लागले. देवेगौडा यांच्याआधी जे मुख्यमंत्री होते त्यांनी अनुग्रहऐवजी कावेरी बंगल्यात मुक्काम केला होता, मात्र त्यांनाही कार्यकाळ पूर्ण करता न आल्याने देवेगौडा यांना कावेरी बंगला 
 
शापित वाटत होता. देवेगौडा यांच्यानंतर मुख्यमंत्री बनलेल्या एस.एम.कृष्णा, धरम सिंह आणि सदानंद गौडा यांनी अनुग्रह बंगल्यात मुक्काम ठोकला होता. या तिघांनाही कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. या तिघांनी या बंगल्यामध्ये त्यांना वास्तूशास्त्रज्ञाने दिलेल्या सल्ल्यानुसार बदल करून घेतले होते. कुमारस्वामी यापूर्वीही कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. फेब्रुवारी २००६ साली त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं. त्यांचे भाऊ रेवण्णा यांनी त्यांच्यासाठी अनुग्रह बंगल्यात पुन्हा वास्तूशास्त्रानुसार बदल करवून घेतले मात्र कुमारस्वामी यांना देखील मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.