1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 डिसेंबर 2022 (18:21 IST)

वरात दाराशी सोडून नवरी प्रियकरासह फरार

wedding bridal lehenga
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून मिरवणुका सुरू आहेत. पण, लग्नाची मिरवणूक डुंगरपुरात येण्याआधीच नवरी पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाचा मंडप घातलेला असता सकाळी नवरी प्रियकरासह पळून गेली. विशेष म्हणजे, दोन सक्ख्या भावांचे लग्न दोन सक्ख्या बहिणीसह होणार होते, मात्र लग्नाच्या पूर्वी एक बहीण पळून गेली. पोलिसांनी नवरी प्रियकराला पकडले असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. 

मिळालेल्या माहितीनुसार,जिल्ह्यातील सीमालवाडाच्या कम्बोईया येथे एका टाऊनशिप मध्ये 4 डिसेंबर रोजी सायंकाळी दोन सख्ख्या भावांशी दोन सख्ख्या बहिणींचे लग्न होणार होता. संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण असून वरात येण्याची वाट पाहत होते. रविवारी वरात निघणार होती. त्या पूर्वी नवरी घरी नसल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. घरात नवरीचा शोध घेतल्यावर ती कुठेच सापडली नाही.वरात दारी आल्यावर नवरीची विचारपूस करण्यात आली. नंतर नवरीला न घेता वरात परतली. नवरी पळून गेल्याने तिच्याच लहान बहिणीसोबत लग्न करण्याची मागणी नवरदेव करू लागला. मात्र, छोट्या बहिणीने नकार दिला. नंतर समजलं की नवरी आपल्या प्रियकरासोबत फरार झाली आहे.पोलिसांनी नवरीची लोकेशन उदयपूर येथे सापडल्यावर पोलिसांनी तिला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. पोलीस फरार नवरीला परत घेऊन आले तेव्हा तिने आरोपी युवक समीर याने आपलं अपहरण करून अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली.
 
Edited by - Priya Dixit