शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 12 जुलै 2021 (10:58 IST)

वीज कोसळून यूपी, एमपी आणि राजस्थान मध्ये 67 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशात कहर म्हणून पाऊस कोसळत आहे. पावसा दरम्यान वीज कोसळ्याने उत्तर प्रदेशात 38 जणांचा मृत्यू झाला आहे, तर राजस्थानमध्ये 20 जणांचा बळी घेतला आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील वेगवेगळ्या भागात वीज कोसळल्यामुळे आतापर्यंत 7 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनीही राजस्थानात वीज कोसळल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5-5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
 
राजस्थानमध्ये रविवारी वीज कोसळल्याने 20 जणांचा मृत्यू झाला. जयपूरच्या आमेर पॅलेसच्या वॉच टॉवरवरही विजांचा कडकडाट झाला आणि त्यांनी तेथील पर्यटकांना काळचा ग्रास बनवले. एकट्या जयपूरमध्ये 12 मृत्यूची नोंद झाली आहे. आमेर महालच्या वॉच टॉवरवर प्राण गमावलेल्या बहुतेक लोक सेल्फी घेत होते. त्यानंतर आकाशातून वीज कोसळल्याने तेथे उपस्थित लोक आसपासच्या झुडुपात पडले.
 
उत्तर प्रदेशातही 40 लोकांचा बळी गेला
रविवारी उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यात वीज कोसळली. एकूण 40 लोक मरण पावले आहेत. कानपूर व लगतच्या जिल्ह्यात 18, प्रयागराजमधील 13, कौशांबीमध्ये 3, प्रतापगडमध्ये 1, आग्रामध्ये 3 आणि वाराणसी व रायबरेली जिल्ह्यात प्रत्येकी एक जण मरण पावला. वीज कोसळल्याने अनेक लोक जखमी झाले आहेत. सर्वाधिक नुकसान कानपूर विभागात झाले आहे. कानपूर देहात, भागणीपूर तहसीलच्या वेगवेगळ्या गावात 5 जणांचा मृत्यू झाला, घाटमपूरमधील 1, फतेहपूर जिल्ह्यातील 7 आणि हमीरपूरच्या अप्पर खेड्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. घाटमपूरमध्येही 38 जनावरांचा मृत्यू झाला आहे. प्रयागराजमधील मेघगर्जना दरम्यान, वेगवेगळ्या भागात वीज कोसळल्याने 13 जण ठार तर चार जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.