HC ची हिंदू मुलीला मुसलमान बॉयफ्रेंडसह लिव्ह इनची परवानगी
गुजरात हाय कोर्टाने 19 वर्षाच्या एका हिंदू मुलीला 20 वर्षाच्या तिच्या मुसलमान बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इन मध्ये राहण्याची परवानगी दिली आहे जे सध्या लग्नासाठी योग्य नाही.
बनासकांठा जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात राहणार्या या मुलीच्या इच्छेप्रमाणे तिला परवानगी देण्यात आली आहे. कोर्टाप्रमाणे त्यांच्याकडे मुलीला रोखण्यासाठी कोणतंही पॉवर नाही जी 19 वर्षाची आहे आणि आपली पसंत समजण्या योग्य आहे.
मुलगा आणि मुलगी दोघे एकाच शाळेत होते आणि त्या दरम्यान ते प्रेमात पडले. दोघेही धर्म परिवर्तित करायला तयार नाहीये म्हणून त्याच्यांकडे एकच पर्याय आहे स्पेशल मॅरिजेस अॅक्ट अंतर्गत रजिस्ट्रेशन. मुलगी यासाठी योग्य असली तरी मुलाचं वय 21 वर्ष नसल्यामुळे त्यांना मैत्री करारावर हस्ताक्षर करावे लागले. हे फ्रेंडशिप ऍग्रीमेंट गुजरातमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपसाठी आवश्यक आहे.
तसेच मुलीचे पालक सप्टेंबरमध्ये तिला जरबजस्तीने वापस घेऊन गेले होते. पण मुलाने याचिका दायर करून तिला तेथून मुक्त करवले.
कोर्टाने नोटिस जारी केल्यावर पोलिस तिला कोर्टासमोर घेऊन आले जिथे तिने म्हटले की मुलगा 21 वर्षाचा झाल्यावर ते लग्न करतील परंतू तिला आई-वडिलांकडे राहायचे नाही.