शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 21 ऑगस्ट 2023 (20:40 IST)

ऑनलाईन पाहता येणार चंद्रयान 3 चं लाइव्ह लँडिंग, तीन प्लॅटफॉर्म्सवर थेट प्रक्षेपण

Chandrayaan 3
23 ऑगस्ट, 2023 ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतारण्यासाठी सज्ज आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (ISRO) नं सांगितलं आहे की चंद्रयान 3 23 ऑगस्ट, 2023 ला संध्याकाळी भारतीय वेळेनुसार जवळपास 6:04 वाजता चंद्रावर लँड केला जाईल. ही सॉफ्ट लँडिंग DD national टीव्ही व्यतिरिक्त ऑनलाइनही अनेक प्लॅटफॉर्म्सवरून पाहता येईल. पुढे आम्ही Chandrayaan 3 Landing Live कुठेकुठे पाहता येईल हे सांगितलं आहे.
 
Chandrayaan 3 Landing Live:
ISRO नं आपल्या ऑफिशियल ट्विटर अर्थात X अकाऊंटवरून ट्वीट करून Chandrayaan 3 Landing ऑनलाइन लाइव्ह दाखवण्याची पद्धत सांगितली आहे. ट्वीटनुसार, चंद्रयान 3 लाइव्ह लँडिंग ISRO च्या वेबसाइटवर जाऊन देखील लाइव्ह पाहता येईल. तसेच, YouTube वर जाऊन देखील लाइव्ह पाहता येईल इतकंच नव्हे तर ISRO च्या फेसबुक पेजवर देखील चंद्रयानची लाइव्ह लँडिंग पाहता येईल.
 
चंद्रयान 3 लँडिंग ऑनलाइन बघण्याचे तीन मार्ग
इसरोच्या वेबसाइटवर चंद्रयान 3 सॉफ्ट लँडिंग लाइव्ह बघण्यासाठी तुम्ही https://www.isro.gov.in/ वर जाऊ शकता.
ISRO Official युट्युब चॅनेलवर लाइव्ह बघण्यासाठी तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करा: https://www.youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss
फेसबुक पेजच्या माध्यमातून ऑनलाइन चंद्रयान लँडिंगसाठी https://www.facebook.com/ISRO वर जा किंवा इथे क्लिक करून थेट त्या पेजवर जाऊ शकता.
जर तुम्ही Chandrayaan 3 ह्या मार्गांनी ऑनलाइन पाहू शकतं नसाल तर टीव्हीवर DD National वाहिनीवर देखील हे लँडिंग लाइव्ह दाखवलं जाईल.
 
चंद्रयान 3 मिशन:
चांद्रयान 3 14 जुलै रोजी अवकाशात झेपावलं होतं त्यानंतर 22 दिवसांनी चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत पोहोचलं होतं. प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल मिळून प्रक्षेपणाच्या वेळी चांद्रयान 3 चं वजन 3900 किलो किलो होतं. चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणासाठी लाँच वेहिकल मार्क 3 (एलव्हीएम 3) चा वापर उरकण्यात आला होता. विशेष म्हणजे एलव्हीएम 3 मध्ये पृथ्वीनजीकच्या कक्षेत सर्वाधिक 10 हजार किलो वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे.