बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 3 डिसेंबर 2023 (12:27 IST)

चिकन बिर्याणीत पाल, ऑनलाइन ऑर्डर केली होती

एका किळसवाणी प्रकारात ऑनलाइन ऑर्डर केलेल्या चिकन बिरर्याणीत पाल आढळून आली आहे. ही घटना हैदराबाद येथील असून यामुळे पुन्हा एकदा ऑनलाइन फूडच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्हे उपस्थित केली जात आहेत.
 
हैदराबाद येथील आरटीसी क्रॉस रोडवर असलेल्या बावर्ची बिर्याणी येथून ऑनलाइन ऑर्डर केलेल्या चिकन बिर्याणीत मृत पाल आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वृत्तानुसार या घटनेनंतर संबंधित ग्राहकाने आपल्या कुटुंबासह दुकानासमोर जाऊन घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ आता समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
या घटनेबद्दल कळल्यानंतर लोकांनी संबंधित रेस्टॉरंटमधून बाहेर पडण्यास सुरुवात केली. 
 
यापूर्वी ऑनलाइन ऑर्डर केलेल्या हैदराबादी फिश बिर्याणीच्या प्लेटमध्ये मृत झुरळ आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. ज्यानंतर कस्टमरने Reddit वर या घटनेचा व्हिडीओ पोस्ट केला होता.