गुरूवार, 15 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 21 डिसेंबर 2016 (17:27 IST)

२६ जानेवारीच्या परेडमध्ये महाराष्ट्राकडून लोकमान्य टिळकांवर चित्ररथ

lokmanya tilak
येत्या 26 जानेवारीला दिल्लीत राजपथावर होणाऱ्या परेडमध्ये महाराष्ट्राकडून  लोकमान्य टिळकांवर चित्ररथ साकारण्यात येणार आहे. लोकमान्य टिळकांनी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच!” अशी सिंहगर्जना केली होती. या सिंहगर्जनेचं सध्या जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. त्यामुळे या चित्ररथातून लोकमान्य टिळकांना आदरांजली देण्यात येणार आहे. साल 2016 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये रोटेशन पद्धतीमुळे महाराष्ट्राचा चित्ररथ साकारण्यात आला नव्हता.