ब्रेकअप झाल्याने प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

Last Modified सोमवार, 22 जून 2020 (07:37 IST)
प्रेयसीने ब्रेकअप केल्याने माथेफिरू विवाहीत तरुणाने (२६) तिची झोपेत गोळ्या घालून हत्या केली. पण ती ठार झाल्याची खात्री करण्यासाठी त्याने नंतर तिच्या गळ्यावर अनेकवेळा भोसकल्याची भयंकर घटना दक्षिण कोलकाता येथे घडली आहे. प्रियंका पुरैकत (२०) असे मृत तरुणीचे नाव असून राकेश हल्दर (२६) असे आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

प्रियंका व राकेश यांचे चार वर्षांपासून अनैतिक संबंध होते. राकेश विवाहीत असल्याने त्याने प्रियंकाबरोबर लग्नास नकार दिला होता. यामुळे संतप्त झालेल्या प्रियंकाने राकेशबरोबर प्रेमसंबध ठेवण्यास नकार दिला व त्याच्याशी संबंध तोडले. यामुळे राकेश संतापला होता. त्याने वारंवार प्रियंकाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिने त्याला नकार दिला. यामुळे प्रियंकाला कायमची अद्दल घडवण्याचा राकेशने निर्णय घेतला. त्यासाठी त्याने युट्यूबवर बंदूक कशी तयार करायची ते बघितले. त्यानंतर त्याने एक बंदूक बनवली. प्रियंका आई व काकीबरोबर राहत होती. सकाळी आठच्या सुमारास ती झोपली असताना राकेश मागच्या दाराने तिच्या घरी गेला. प्रियंकाची आई कामासाठी बाहेर गेली होती. तर काकी अंगणात होती. हे बघून राकेशने झोपेत असलेल्या प्रियंकावर गोळ्या झाडल्या. त्यात तीचा जागीच मृत्यू झाला. पण ती मृत झाल्याची खात्री पटवण्यासाठी राकेशने चाकूने तिच्या गळ्यावर अनेकवेळा भोसकले. पण प्रियंका काहीच प्रतिकार करत नसल्याचे बघून तिचा मृत्यू झाल्याची राकेशची खात्री झाली. त्यानंतर सायकलवरून तो पळून गेला. पण प्रियंकाच्या काकीने त्याला घरातून बाहेर पळत येताना बघितले. आत जाऊन बघताच प्रियंकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह बघून तिने आरडाओरडा केला. त्यानंतर पोलिसांनी राकेशच्या मुसक्या आवळल्या.


यावर अधिक वाचा :

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...

सरबजीत सिंगची बहीण दलबीर कौर यांचे निधन

सरबजीत सिंगची बहीण दलबीर कौर यांचे निधन
काही वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या तुरुंगात मारल्या गेलेल्या पंजाबच्या सरबजीत सिंगची बहीण ...

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरवर पक्ष्याची ...

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरवर पक्ष्याची धडक , वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. सीएम योगींच्या ...

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आयएएस ...

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आयएएस अधिकाऱ्याच्या मुलाचा गोळी लागल्याने मृत्यू,  हत्येचा आरोप दक्षता पथकावर केला
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी संजय पोपली ...

राष्ट्रपतीपदासाठी मुर्मू यांना 'बसप'चा पाठिंबा; मायावती ...

राष्ट्रपतीपदासाठी मुर्मू यांना 'बसप'चा पाठिंबा; मायावती यांची घोषणा
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू ...

तीस्ता सेटलवाड यांना गुजरात एटीएसनं ताब्यात घेतले

तीस्ता सेटलवाड यांना गुजरात एटीएसनं ताब्यात घेतले
सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना गुजरात एटीएसनं घेतलं ताब्यात घेतलं आहे.गुजरात ...