गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 सप्टेंबर 2017 (17:15 IST)

१४ भोंदू बाबांची यादी जाहीर करणारे महंत मोहन दास बेपत्ता

देशातील १४ भोंदू बाबांची यादी जाहीर करणारे आखाडा परिषदेचे महंत मोहन दास दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत. उत्तराखंड पोलिसांनी त्यांचा कसून शोध सुरू केला आहे. महंत मोहन दास गायब असल्याचं समजल्यापासून संतांमध्ये रोष आहे. आता  24 तासांमध्ये मोहन दास यांचा शोध न लागल्यास संतांकडून उत्तराखंड सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते महंत मोहनदास बेपत्ता झाले असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हरिद्वारहून मुंबईच्या दिशेने जात असताना रेल्वे प्रवासात महंत मोहनदास बेपत्ता झाले आहेत. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास महंत मोहनदास यांचा एक शिष्य भोपाल रेल्वे स्थानकावर जेवण घेऊन आला होता, त्यावेळी महंत मोहनदास बेपत्ता झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. यानंतर त्याने महंत गायब झाल्याची माहिती आखाड्याला दिली. पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून, तपास सुरु आहे.