बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 4 जून 2020 (12:41 IST)

’इंडिया' ऐवजी ‘भारत' करा; ‘सर्वोच्च न्यायालयाने 'ने याचिका फेटाळली

भारतीय राज्यघटनेतून ‘इंडिया' शब्द काढून टाकावा आणि केवळ ‘भारत' हे नाव ठेवावे अशी मागणी करणार्‍या  याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या याचिकेची प्रत संबंधित मंत्रालयाला पाठवावी तिथे याबाबत निर्णय  होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

घटनेतील कलम 1 मध्ये सुधारणा करून ‘इंडिया' हा शब्द हटवावा. त्यासाठी संविधानाच्या अनुच्छेद 1 मध्ये सुधारणा करण्याचे आदेश न्यायालयाने केंद्राला द्यावेत अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली होती. हा अनुच्छेद देशाच्या नावाशी संबंधित आहे. यामध्ये बदल करून ‘इंडिया' या इंग्रजी नावाऐवजी ‘भारत' नाव वापरावे अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली होती.

दिल्ली येथील रहिवासी असलेल्या नमह नावाच्या एका व्यक्तीने ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.