बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 31 मे 2021 (23:16 IST)

ममता यांनी केंद्र सरकारचा प्रस्ताव नाकारला,सीएस सेवा निवृत्त.

कोलकाता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्य सचिव राज्यमंत्री अलपन बंदोपाध्याय यांना दिल्ली येथे बोलविण्याच्या  केंद्र सरकारच्या प्रस्तावाला नाकारले असून बंगाल सरकारने अलपन बंदोपाध्याय यांना सेवानिवृत्त करून मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त केले.
 
बंगालचे मुख्य सचिव बंदोपाध्याय यांच्या सेवा केंद्र सरकारकडे ट्रान्सफर करण्याबाबत केंद्र सरकारने नुकतीच चर्चा केली होती, तर
ममता यांनी केंद्राला असे न करण्याची विनंती केली होती. त्याच वेळी, कोविडच्या युद्धाच्या दरम्यान ममतांनी अलपनला केंद्रात स्थानांतरित करण्याच्या आदेशाचे पालन करणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, बंदोपाध्याय निवृत्त झाल्यानंतर एच के द्विवेदी बंगालचे नवे मुख्य सचिव असतील.
या पूर्वी बंदोपाध्याय यांना 3 महिन्यांचा सेवा विस्तार मिळाला. त्यांनी मुदतवाढ नाकारून निवृत्तीचा निर्णय घेतला. दरम्यान, सरकारने त्यांना मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार केले.
 
सेवानिवृत्तीनंतर बंदोपाध्याय यांच्या प्रतिनियुक्तीवर दिल्लीला अहवाल देण्याबाबतचे प्रकरण बंद झाले. सोमवारी रात्री दहा वाजता ते दिल्ली कार्यालयात रिपोर्ट करणार होते.