सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

दुसर्‍याच्या पत्नीसह पकडला गेला, घाबरून पाचव्या माळ्यावरून उडी मारली

नवी दिल्ली- साऊथ दिल्लीच्या टिगाडी पोलिस स्टेशन भागात एक व्यक्ती दुसर्‍याच्या बायकोसोबत होता तेव्हा तिथे महिलेचा पती पोहचला. त्याला घाबरून व्यक्तीने पाचव्या माळ्यावरून खाली गल्लीत उडी मारली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
 
पोलिसांप्रमाणे हे घटना मंगळवार संध्याकाळची आहे. चौकशीप्रमाणे मंगळवार संध्याकाळी महिला घरी एकटी होती. तेव्हा तिथे पंकज पोहचला. दोघेही घरात होते. या दरम्यान महिलेचा पती घरी पोहचला. त्याने दोघांना एका खोलीत कोंडून दिले. बदनामीच्या भीतीने त्याने पाचव्या माळ्यावरून उडी मारली.  
 
मृतक पंकज शादीपुर डिपोमध्ये नोकरी करत होता. तो मागील दोन वर्षांपासून महिलेच्या संपर्कात होता. त्याला वरुन धक्का दिला असावा अशी देखील शंका वर्तवण्यात येत आहे. तरी प्रकरणात पोलिस तपासणी करत आहे.