बुधवार, 28 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated: गुरूवार, 16 मे 2019 (15:21 IST)

महाराष्ट्र होरपळत असताना उद्धव ठाकरे रोममध्ये : मलिक

इटलीची राजधानी रोम जळत होते तेव्हानिरो गिटार वाजवत होता तर आता महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र कुटुंबांसह रोमध्ये सुट्टी घालवत आहेत असा टोला राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी हाणला आहे.
 
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मागील आठवड्यात पत्नी रश्मी ठाकरे, युवा सेनानेते आदित्य ठाकरे व धाकटा मुलगा तेजस ठाकरे यांच्यासह युरोपात फिरायला गेले आहेत. उद्धव ठाकरे दरवर्षी उन्हाळ्यात बाहेरच्या देशात फिरायला जातात. यंदा उद्धव कुटुंबीयांसह इटलीला गेले आहेत. सध्या त्यांचा मुक्काम रोममध्ये असल्याचे कळते. त्यामुळे राष्ट्रवादीने यावरून चिमटा काढला आहे.

मलिक यांनी याबाबत ट्विट करून म्हटले की, रोम जळत होते तेव्हा निरो गिटार वाजवत होता तर आता महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एसी रूममध्ये बसून दुष्काळाचा आढावा घेत आहेत तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र कुटुंबांसह रोममध्ये सुट्टी घालवत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे लवकरच भारतात परतणार असल्याचे समजते.