नवलेपूल परिसरात दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा दुर्देवी मृत्यू, मैत्रीण जखमी
कात्रज बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बसची दुचाकीस्वाराला धडक बसून महाविद्यालयीन तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्यांसह सहप्रवासी तरुणी जखमी झाली आहे.
नितीन जुनवणे(19) रा. धायरी फाटा, सिंहगड रस्ता असे मृत्युमुखी तरुणाचे नाव आहे. तक्रारदार तरुणी आणि मयत नितीन हे महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
दुचाकीस्वार नितीन आणि त्याची मैत्रीण नवले पूल परिसरातून कात्रजकडे रात्री पावणेदहाच्या सुुमारास निघाले होते. त्या वेळी प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बसने दुचाकीला धडक दिली. अपघातात दोघे जण जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार नितीन याचा रुग्णालयात उपचारापूर्वींच मृत्यू झाला. या अपघातांनंतर बसचालक पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
Edited By - Priya Dixit