10000 खोल्या असलेल्या महालात राम कुठे जन्माला आले, असा दावा कसा करू शकता...
एकीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आपल्या सॉफ्ट हिंदुत्वाची गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे काँग्रेस नेता गाडी रुळावरून खाली घसरवण्याच्या प्रयत्नात आहे. मणिशंकर अय्यर यांनी प्रभू राम यांच्या जन्म स्थळावर प्रश्न करत एकदा पुन्हा पक्षाला अडचणीत टाकले आहे.
राजधानी दिल्ली येथे सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया द्वारे आयोजित कार्यक्रमात 'एक शाम बाबरी मस्जिद के नाम' यात अय्यर यांनी म्हटले की मंदिर नक्कीच बांधले जाईल परंतू आपण असे कशा प्रकारे म्हणू शकता की मंदिर तिथेच बांधू.
त्यांनी प्रभू श्रीराम यांच्या जन्म स्थळावर प्रश्न मांडत म्हटले की दशरथ मोठे राजा होते त्यांच्या महालात तर 10 हजार खोल्या होत्या. अशात आपण दावा कसा करू शकता की राम तिथेच जन्माला आले होते. अय्यर यांनी म्हटले की जिथे मशीद आहे तिथेच राम मंदिर बांधण्याची जिद्द का?
उल्लेखनीय आहे की मणिशंकर आपल्या विवादित विधानांसाठी चर्चेत असतात आणि पक्षाची समस्या वाढवत असतात. गुजरात निवडणुकीत देखील पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध अय्यर यांनी विवादित विधान केल्यामुळे पक्षाने त्यांना निलंबित केले होते नंतर त्यांना पुन्हा पक्षात घेतले गेले.