गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 21 डिसेंबर 2022 (16:26 IST)

Manipur Bus Accident: मणिपूरमध्ये भीषण बस अपघात, अनेक विद्यार्थ्यांच्या मृत्यूची बातमी

accident
इंफाळ. मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात बुधवारी स्कूल बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातात थंबलानू उच्च माध्यमिक विद्यालयातील 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. प्राथमिक माहितीनुसार, यारीपोक येथील थंबलानू उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन दोन बस शिक्षण दौऱ्यावर खापुम येथे जात असताना हा अपघात झाला.
 
 वृत्तानुसार, 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासोबतच अनेक विद्यार्थीही जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात बिष्णुपूर-खौपुम रस्त्यावर लोंगसाई तुबुंग गावाजवळ झाला. जखमी विद्यार्थ्यांवर इंफाळ येथील मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अहवालानुसार, आतापर्यंत 22 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
या अपघातानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एक व्हिडिओ ट्विट करून अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. सिंह यांनी ट्विट केले की, "आज जुना काचार रोडवर शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या बसला झालेल्या अपघाताबाबत कळून खूप दुःख झाले. एसडीआरएफ, वैद्यकीय पथक आणि आमदार मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. बसमधील सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत आहे.”
Edited by : Smita Joshi