1 मिनिटात 109 पुश-अप्सचा विक्रम, मणिपूरच्या तरुणाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला
मणिपूरच्या एका 24 वर्षीय तरुणाने असा पराक्रम केला आहे, ज्यामध्ये भल्याभल्यांचा घाम सुटतो. राज्यातील थौनाओजम निरंजय सिंग (Thounaojam Niranjoy Singh) नावाच्या मुलाने अवघ्या एका मिनिटात 109 पुश-अप्स पूर्ण करून नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. निरंजय सिंगने यावेळी त्यांचा 105 पुश-अपचा जुना विक्रम अतिशय आरामात मोडला. ANI मध्ये दिलेल्या वृत्तानुसार, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रयत्नाचे आयोजन अझ्टेक स्पोर्ट्स मणिपूरने इम्फाळमधील अझ्टेक फाईट स्टुडिओमध्ये केले होते.
सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये निरंजय त्याचे कारनामे दाखवताना दिसत आहे. कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी निरंजय सिंग यांचे ट्विटरवर अभिनंदन केले आहे. रिजिजू यांनी ट्विट केले, "मणिपुरी युवक टी. निरंजय सिंगची अविश्वसनीय ताकद पाहून आश्चर्य वाटले, ज्याने एका मिनिटात सर्वाधिक पुश-अप (फिंगरटिप्स) करण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. मला त्याच्या यशाचा खूप अभिमान आहे.