बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मानुषीचे भारतात जोरदार स्वागत

तब्बल १७ वर्षानंतर भारताला मिस वर्ल्डचा किताब मिळवून देणारी ब्युटी विथ ब्रेन मानुषी छिल्लरचं मध्यरात्री भारतात आगमन झालं. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालेल्या मानुषीचं देशवासीयांनी जोरदार स्वागत केलं.
 
चीनमध्ये पार पडलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेऊन भारताला मिस वर्ल्डचा किताब मिळवून दिल्यानंतर मानुषी सिंगापूरला गेली होती. नियोजित कार्यक्रमानुसार ती रात्री भारतात येणार होती. मानुषीचं आगमन होणार म्हणून तिच्या हजारो चाहत्यांनी विमानतळावर रात्री १२ वाजताच ठाण मांडलं . हातात तिरंगा घेऊन आलेल्या तिच्या चाहत्यांनी मानुषीचं विमानतळावर आगमन होताच एकच जल्लोष केला. मानुषीची झलक टिपण्यासाठी कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकू लागले. मानुषीनेही हात उंचावत हसतमुखाने सर्वांच्या अभिवादनाचा स्विकार करत सर्वांना धन्यवाद दिले. यावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते.